1 फेब्रुवारीपासून गॅस, प्रवास, पान मसाला, फास्टॅग आणि बँकिंगमध्ये मोठे बदल. New Rules February 2026

New Rules February 2026  : फेब्रुवारी महिन्याची सुरुवात आणि २०२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा दिवस एकाच तारखेला आल्याने सामान्य नागरिकांच्या जीवनावर परिणाम करणारे अनेक महत्त्वाचे बदल लागू होत आहेत. स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतींपासून ते पान मसाल्यावरील कर, फास्टॅग नियम आणि बँकांच्या सुट्ट्यांपर्यंत या बदलांचा थेट परिणाम घरगुती बजेट आणि दैनंदिन खर्चावर होणार आहे.

दर महिन्याच्या पहिल्या तारखेला जसे होते तसेच, १ फेब्रुवारी २०२६ रोजी तेल विपणन कंपन्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत सुधारणा करणार आहेत. बजेटच्या दिवशीच हे दर जाहीर होणार असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष याकडे लागले आहे. विशेषतः १४ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कपात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा 👇🏻  आयकर विधेयक 2025 मधून पेन्शनधारक आणि NPS साठी काय बदल होतील? सविस्तर वाचा.New Income Tax Bill 2025

याआधी १ जानेवारी रोजी १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत ₹१४.५० ने घट करण्यात आली होती. दिल्लीत त्याची किंमत ₹१८०४ इतकी झाली होती. आता घरगुती ग्राहकांनाही असा दिलासा मिळतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

एलपीजीप्रमाणेच १ फेब्रुवारीपासून एअर टर्बाइन फ्युएल (ATF) चे नवीन दर लागू होतील. एटीएफच्या किमतीत बदल झाल्यास त्याचा थेट परिणाम विमान भाड्यावर होतो. गेल्या महिन्यात दिल्लीत एटीएफच्या किमती सुमारे ७ टक्क्यांनी कमी झाल्या होत्या, त्यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला होता.

तसेच CNG आणि PNG च्या दरांमध्येही बदल होण्याची शक्यता असून, याचा परिणाम वाहन खर्च आणि घरगुती गॅस बजेटवर होऊ शकतो. New Rules February 2026

हे ही वाचा 👇🏻  सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी. 8 व्या वेतन आयोगाबाबत नवीन माहिती समोर. 8 th pay Commission 2026

दरम्यान, सरकारने तंबाखूजन्य पदार्थ आणि पान मसाल्यावरील कर रचनेत मोठा बदल केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता GST व्यतिरिक्त उत्पादन शुल्क तसेच आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर (Cess) आकारला जाणार आहे. यामुळे सिगारेट आणि पान मसाल्याच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

वाहनधारकांसाठी मात्र दिलासादायक बातमी आहे. NHAI ने १ फेब्रुवारीपासून फास्टॅगसाठी KYC अट रद्द केली आहे. त्यामुळे कार, जीप आणि व्हॅनसाठी फास्टॅग काढणे अधिक सोपे होणार आहे.

फेब्रुवारी महिन्यात बँकिंग व्यवहार करताना नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. RBI च्या कॅलेंडरनुसार, आठवड्याच्या सुट्ट्या आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीसारख्या सणांमुळे फेब्रुवारीत बँका एकूण १० दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे आवश्यक कामे वेळेपूर्वी पूर्ण करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

हे ही वाचा 👇🏻  आठव्या वेतन आयोगापूर्वी या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. 8th pay employees news

1 फेब्रुवारीपासून लागू होणारे महत्त्वाचे बदल. New Rules February 2026

  • घरगुती LPG सिलिंडरच्या किमतीत बदल होण्याची शक्यता
  • ATF दरात बदल झाल्यास विमान भाड्यावर परिणाम
  • पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थ महागण्याची शक्यता
  • फास्टॅगसाठी KYC अट रद्द, प्रक्रिया सोपी
  • फेब्रुवारीत बँका 10 दिवस बंद, ग्राहकांना अडचणी संभवतात New Rules February 2026

Leave a Comment