जानेवारी वेतन (फेब्रुवारी 2026 मध्ये देय) साठी अनुदान निधी वितरणाबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय.Maharashtra Salary Grant 2026

जानेवारी वेतन (फेब्रुवारी 2026 मध्ये देय) साठी अनुदान निधी वितरणाबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय

मुंबई : Maharashtra Salary Grant 2026 :   माहे जानेवारी 2026 चे वेतन फेब्रुवारी 2026 मध्ये अदा करण्यासाठी अनुदान निधी वितरणाबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दि. 04 फेब्रुवारी 2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आला आहे.

या शासन निर्णयानुसार राज्यातील विविध शैक्षणिक व क्रीडा संबंधित योजना व घटकांसाठी वेतन आणि अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

हे ही वाचा 👇🏻  सोन्याबद्दलची सर्वात मोठी बातमी- ट्रम्पच्या ५ शब्दांच्या पोस्टनंतर सोन्याच्या किमती थेट.....Trump Tariff on Gold

निधी वितरण करण्यात आलेल्या प्रमुख बाबी

या शासन निर्णयामध्ये खालील योजनांसाठी निधी वितरणाचा समावेश आहे — Maharashtra Salary Grant 2026

  • सर्वसाधारण शिक्षण
  • प्राथमिक शिक्षण
  • प्राथमिक शिक्षणासाठी स्थानिक संस्थांना सहाय्य
  • प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना
  • ई-गव्हर्नन्स कार्यक्रम
  • अनुसूचित जातींसाठी विशेष घटक योजना
  • अनुसूचित जाती उपयोजना
  • जनजाती क्षेत्र उपयोजना
  • क्रीडा व युवक सेवा
  • राज्यातील क्रीडा विषयक सोयी-सुविधांचे सर्वेक्षण
  • माध्यमिक शाळांना सहायक अनुदाने
  • अशासकीय कनिष्ठ महाविद्यालयांना सहायक अनुदाने
  • सैनिकी शाळांमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या तुकडीस सहाय्य

वेतन अदा करण्यास मार्ग मोकळा. Maharashtra Salary Grant 2026

या निधी वितरणामुळे संबंधित विभागातील अधिकारी, शिक्षक व कर्मचाऱ्यांचे जानेवारी 2026 चे वेतन वेळेत अदा करण्याचा मार्ग मोकळा झाला असून, शैक्षणिक व क्रीडा उपक्रम सुरळीत राबविण्यास मदत होणार आहे.

हे ही वाचा 👇🏻  ईपीएफओचे नवे मोबाइल अ‍ॅप एप्रिलमध्ये लाँच; यूपीआयद्वारे थेट पीएफ काढता येणार. EPFO New App

सविस्तर GR कुठे पाहाल?

या संदर्भातील सविस्तर निधी वितरणाचा शासन निर्णय (GR) संबंधित अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून, तो पुढीलप्रमाणे पाहता येईल. खालील लिंक ला क्लिक करून संपूर्ण GR वाचू शकतात 👇🏻

https://drive.google.com/file/d/110Tfxp13PkYGiUzGjK_wr4FOvldc3VYF/view?usp=drivesdk


 

Leave a Comment