एसटी कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतनाची फाईल अर्थखात्याकडे पडून, 24 तारखेला बोंबा मारो आंदोलन. Msrtc employees salary

एसटीच्या ८६ हजार कर्मचाऱ्यांचा पगारवाढीचा फरक रखडला; २४ फेब्रुवारीला ‘बोंब मारो’ आंदोलनाचा इशारा. Msrtc employees Salary. 

मुंबई : Msrtc employees Salary : राज्यातील (एसटी) मधील तब्बल ८६ हजार कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा फरक थकवून ठेवणारी फाईल गेल्या दहा दिवसांपासून अर्थ खात्यात निर्णयाविना पडून असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या वेतनासोबत वाढीव फरकाचा हप्ता मिळेल, या अपेक्षेने बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या पदरी मात्र निराशाच पडली आहे. त्यामुळे एसटी वर्तुळात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे ही वाचा 👇🏻  पेन्शन मध्ये वाढ, पेन्शन धारक आनंदी, जाणून घ्या संपूर्ण माहिती, pension increase August

एसटी कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतनासंदर्भातील प्रस्ताव १० फेब्रुवारीपासून अर्थ खात्यात प्रलंबित असल्याचा दावा ने केला आहे. संघटनेचे सरचिटणीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “परिवहन विभागाने पाठपुरावा करूनही अर्थ खात्याकडून निर्णय होत नाही. अधिकाऱ्यांची कानउघडणी केल्याशिवाय कर्मचारी स्वस्थ बसणार नाहीत.”

१९२ कोटींची अतिरिक्त मागणी. Msrtc employees Salary. 

एसटी महामंडळाने निधीअभावी वेतनवाढीचा फरक देणे अशक्य झाल्याचे स्पष्ट करत राज्य सरकारकडे १९२.४६ कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी केली आहे. दरमहा सवलत मूल्य प्रतिपूर्तीसह एकूण ७२५.४६ कोटी रुपयांची आवश्यकता असताना प्रत्यक्षात केवळ ४०० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या आर्थिक तुटवड्यामुळेच वेतनवाढीचा फरक अडकल्याचे सांगितले जात आहे.

हे ही वाचा 👇🏻  १ कोटींहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारक निराश, जाणून घ्या संपूर्ण माहिती. Employee fitment factor update

आझाद मैदानावर आंदोलन. Msrtc employees Salary. 

या पार्श्वभूमीवर २४ फेब्रुवारी रोजी मुंबईतील येथे ‘बोंब मारो’ आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. आंदोलनाची नोटीस परिवहन खात्याच्या अप्पर मुख्य सचिवांमार्फत राज्य सरकारला देण्यात आल्याचे समजते. प्रशासनाला अंतिम मुदत देण्यात आली असून, तोपर्यंत सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

संघटनेने अर्थ खात्यावर थेट निशाणा साधत “अधिकारी झोपेचे सोंग घेत आहेत,” असा आरोप केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री यांनी तातडीने हस्तक्षेप करावा, अन्यथा कर्मचाऱ्यांचा आक्रोश रस्त्यावर उमटेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

हे ही वाचा 👇🏻  देशातील सर्वात मोठ्या बँक SBI वर RBI ने मोठा दंड ठोठावला, ग्राहकांवर काय होणार परिणाम. जाणून घ्या संपूर्ण माहिती.Sbi bank update  

दरम्यान, वेतनवाढीचा फरक रखडल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाची लाट उसळली असून, शासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील काही दिवसांत या प्रश्नावर तोडगा निघतो का, की आंदोलनाची ठिणगी राज्यभर पसरते, याकडे लक्ष लागले आहे.

Leave a Comment