मार्चमध्ये तब्बल 12 दिवस बँका बंद; कामे वेळेत पूर्ण करा, जाणुन घ्या.Bank Holidays In March

मुंबई : Bank Holidays In March  फेब्रुवारी महिना संपत आला असून परवापासून मार्च महिन्याची सुरुवात होणार आहे. महिना बदलला की केवळ कॅलेंडर बदलत नाही, तर आर्थिक व्यवहारांवरही त्याचा परिणाम होतो. मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असल्यामुळे बँकांवर कामाचा मोठा ताण असतो. मात्र याच महिन्यात विविध सण आणि रविवार मिळून तब्बल 12 दिवस बँका बंद राहणार आहेत.

त्यामुळे महत्त्वाचे बँकिंग काम असल्यास आधी सुट्ट्यांची यादी तपासणे आवश्यक आहे, अन्यथा वेळ वाया जाण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा 👇🏻  ज्या लाडक्या बहिनीचे चे पैसे बंद झाले अशांसाठी E-KYC सुधारण्यासाठी 31 मार्चपर्यंत अंतिम मुदत. Ladaki bahin Yojana 2026

आरबीआयच्या यादीप्रमाणे सुट्ट्या. Bank Holidays In March

रिझर्व्ह बँकेच्या (RBI) सुट्टीच्या यादीनुसार, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, जम्मू-काश्मीरसह विविध राज्यांमध्ये मार्च महिन्यात वेगवेगळ्या दिवशी बँका बंद राहतील. होळी, ईद, गुढी पाडवा, रामनवमी, महावीर जयंती यांसारख्या सणांमुळे या सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

याशिवाय मार्च महिन्यात 5 रविवार येत असल्याने त्या दिवशीही बँका बंद राहतील. 


मार्चमध्ये कोणकोणत्या तारखेला बँका बंद?

  • 1 मार्च – रविवार
  • 2 मार्च – होलिका दहन (कानपूर, लखनौ)
  • 3 आणि 4 मार्च – धुलिवंदन, डोल जतरा, होळी (मुंबई, नागपूर, जयपूर, कोलकाता, पाटणा, हैदराबाद, गुवाहाटी आदी शहरांत)
  • 4 मार्च – होळी निमित्त नवी दिल्ली, अहमदाबाद, भुवनेश्वर, चंदीगड, जम्मू इ. ठिकाणी सुट्टी
  • 13 मार्च – चापचर कुट (आयजोल)
  • 17 मार्च – शब-ए-कद्र (जम्मू, श्रीनगर)
  • 19 मार्च – गुढी पाडवा (महाराष्ट्रासह अनेक राज्यांत सुट्टी)
  • 20 मार्च – ईद-उल-फित्र / जुमात-उल-विदा (काही राज्यांत)
  • 26 व 27 मार्च – श्री रामनवमी (अनेक राज्यांत बँका बंद)
  • 31 मार्च – महावीर जयंती (गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आदी राज्यांत सुट्टी)
हे ही वाचा 👇🏻  पाटोदा आगारात शिवजयंती सोहळ्याचे आयोजन; विविध मान्यवरांची उपस्थिती.

(टीप: सुट्ट्या राज्यनिहाय वेगळ्या असू शकतात.)


बँका बंद असल्या तरी सेवा सुरू

बँका बंद असल्या तरी ग्राहकांना डिजिटल सेवा उपलब्ध राहतील:

मात्र, कर्जप्रक्रिया, कागदपत्रांची पडताळणी किंवा शाखेत जाऊन करावयाची कामे यासाठी सुट्टीचा विचार करणे आवश्यक आहे.


ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना. 

मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असल्यामुळे आयकर, गुंतवणूक, कर्ज, खाते बंद/अपडेट, केवायसी प्रक्रिया यांसारखी महत्त्वाची कामे मोठ्या प्रमाणात केली जातात. त्यामुळे बँकेच्या सुट्ट्या लक्षात घेऊनच नियोजन करावे.

हे ही वाचा 👇🏻  ५ लाखांपर्यंत मोफत उपचार, जाणून घ्या आयुष्मान ॲपवरून तुमचे आयुष्मान कार्ड कसे डाउनलोड करायचे? Ayushman app

वेळेवर काम पूर्ण न झाल्यास आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे बँकेत जाण्यापूर्वी संबंधित राज्यातील अधिकृत सुट्टीची यादी तपासणे हितावह ठरेल.

Leave a Comment