महिला शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय! लवकर आल्यास कार्यालयातून लवकर जाण्याची परवानगी. Maharashtra Government Women Employees Rule

Maharashtra Government Women Employees Rule : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने (GAD) 10 मार्च 2026 रोजी महिला शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) जारी केला आहे. या निर्णयामुळे विशेषतः मुंबई महानगर क्षेत्रात (MMR) कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या शासन निर्णयानुसार, मुंबई महानगर क्षेत्रात काम करणाऱ्या महिला शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी जर सकाळी 9.15 ते 9.45 या वेळेत कार्यालयात लवकर येऊन काम सुरू करतील, तर त्यांनी जितक्या मिनिटे लवकर काम सुरू केले असेल तितक्याच मिनिटे त्यांना सायंकाळी कार्यालयातून लवकर जाण्याची परवानगी दिली जाईल. मात्र ही सवलत कमाल अर्धा तास इतकीच असणार आहे.

हे ही वाचा 👇🏻  २४ तासांत सोन्याच्या किमतींनी, सर्व विक्रम मोडण्याची ही दोन सर्वात मोठी कारणे आहेत. Gold new rate December

सरकारने स्पष्ट केले आहे की, या सुविधेमुळे शासकीय कामकाजावर कोणताही परिणाम होऊ नये याची पूर्ण काळजी संबंधित महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेणे आवश्यक आहे. कार्यालयीन कामकाज सुरळीत राहणे हे सर्वांत महत्त्वाचे असल्याचेही शासनाने नमूद केले आहे.

तसेच कार्यालयातील कामाचे महत्त्व लक्षात घेऊन काही वेळा महिला अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेनंतरही थांबणे बंधनकारक असू शकते. विशेषतः विधानमंडळ कामकाज, न्यायालयीन प्रकरणे किंवा तातडीची प्रशासकीय कामे असल्यास संबंधित कर्मचाऱ्यांनी आवश्यकतेनुसार कार्यालयात थांबणे आवश्यक राहणार आहे. Maharashtra Government Women Employees Rule 

याशिवाय, कार्यालयीन कामकाजाची तातडी लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकारी किंवा कार्यालय प्रमुखांनी एखाद्या विशिष्ट दिवशी विशेष सूचना दिल्यास, त्या सूचनांचे पालन संबंधित महिला अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना करणे बंधनकारक राहणार आहे.

हे ही वाचा 👇🏻  बँक लॉकर ग्राहकांसाठी आवश्यक बातमी, सरकारने नियमांमध्ये केला मोठा बदल. Bank locker new rules

या निर्णयामुळे महिला कर्मचाऱ्यांना काम आणि वैयक्तिक जीवन यामध्ये समतोल राखण्यास मदत होणार असल्याचे मानले जात आहे. तसेच प्रवास, कुटुंबीय जबाबदाऱ्या आणि कार्यालयीन वेळ यामध्ये लवचिकता मिळणार असल्यामुळे अनेक महिला कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे. 

Leave a Comment