LPG गॅस सिलेंडरचा तुटवडा, सरकारने लागू केले नवीन वितरण नियम.  LPG Gas New Rules

LPG गॅस सिलेंडरचा तुटवडा, सरकारने लागू केले नवीन वितरण नियम.  LPG Gas New Rules

LPG Gas New Rules  : मध्यपूर्वेतील इराण आणि इस्राईल यांच्यात सुरू असलेल्या तणावाचा परिणाम आता भारतावरही दिसू लागला आहे. देशात LPG गॅसचा पुरवठा मर्यादित झाल्याने गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गॅस बुकिंग नियमांमध्ये बदल केले असून शहरी भागात २५ दिवसांनंतर आणि ग्रामीण भागात ४५ दिवसांनंतर गॅस बुकिंग करण्याचा नियम लागू करण्यात आला आहे.

मात्र तरीही अनेक ठिकाणी ग्राहकांमध्ये गॅस मिळणार की नाही याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक नागरिक गॅस वितरण केंद्रांबाहेर लांबच लांब रांगा लावताना दिसत आहेत. या वाढत्या गॅस टंचाईवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलत गॅस वितरणासाठी विशेष नियमावली जारी केली आहे.

हे ही वाचा 👇🏻  राज्य सरकारी कर्मचारी आणि पेंशनधारक आंदोलनाच्या पवित्र्यात, 21 एप्रिलपासून बेमुदत संपाचा इशारा. Maharashtra employee news

गॅस टंचाईचा सर्वसामान्यांवर मोठा परिणाम.LPG Gas New Rules

गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. मात्र एवढ्यावरच हा परिणाम मर्यादित नसून शहरांतील अनेक मेस, वसतिगृह, हॉटेल आणि रुग्णालयातील कँटिन यांनाही मोठा फटका बसत आहे.

गॅस सिलेंडर वेळेवर मिळत नसल्यामुळे अनेक ठिकाणी मेस बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे शिक्षण किंवा नोकरीसाठी पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि कामगारांना जेवणाची मोठी समस्या निर्माण झाली आहे.


काळाबाजार रोखण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल

LPG गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि अत्यावश्यक सेवांना गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकारने नवीन नियम लागू केले आहेत. या नियमांमुळे काही महत्त्वाच्या संस्थांना प्राधान्याने गॅस पुरवठा केला जाणार आहे.

हे ही वाचा 👇🏻  20 मे पासून या 15 बँका बंद होणार. तुमचे सुद्धा आहे का यात खाते  त्वरित तपासा. Bank closed 

नवीन नियमांनुसार खालील संस्थांना 100 टक्के गॅस पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

  • सर्व रुग्णालये
  • शासकीय आश्रमशाळा
  • अनुदानित आश्रम
  • शाळा वसतिगृह
  • शासकीय खानावळ
  • मध्यान्ह भोजन योजना
  • अंगणवाडी केंद्र

याशिवाय गॅस एजन्सींना दररोज किती संस्थांना गॅस पुरवठा करण्यात आला याचा अहवाल शासनाला सादर करावा लागणार आहे.


काही क्षेत्रांना 70% गॅस पुरवठा. LPG Gas New Rules

राज्य सरकारच्या आदेशानुसार काही महत्वाच्या क्षेत्रांना 70 टक्के गॅस पुरवठा केला जाणार आहे.

यामध्ये खालील क्षेत्रांचा समावेश आहे:

  • उपहारगृहे (रेस्टॉरंट)
  • संरक्षण क्षेत्र
  • शासकीय व सार्वजनिक क्षेत्रातील संस्था
  • रेल्वे सेवा
  • हवाई वाहतूक सेवा
  • पोलीस विभाग
  • तुरुंग प्रशासन

काही उद्योगांसाठी 50% गॅस पुरवठा

काही उद्योग आणि संस्थांसाठी गॅस पुरवठ्याची मर्यादा 50 टक्के ठेवण्यात आली आहे.

हे ही वाचा 👇🏻  कर्मचाऱ्यांना धक्का ! EPS-95 पेन्शनवाढीबाबत केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट; 7,500 रुपये किमान पेन्शनचा प्रस्ताव नाही. EPS-95 Pension News

यामध्ये खालील क्षेत्रांचा समावेश आहे:

  • महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC)
  • औषध उद्योग
  • बीज प्रक्रिया उद्योग
  • मत्स्यपालन संस्था

नागरिकांनी घाबरू नये – प्रशासनाचे आवाहन

गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून जास्त प्रमाणात गॅस बुकिंग करू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

सरकारकडून लागू करण्यात आलेल्या या नव्या नियमांमुळे अत्यावश्यक सेवांना गॅसचा पुरवठा सुरळीत राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment